उदयपूर (राजस्थान) येथे बजरंग दलाशी संबंधित व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

उदयपूर (राजस्थान) – येथे बजरंग दलाशी संबंधित राजेंद्र उपाख्य राजू तेली (वर्ष ३८ वर्षे) यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांनी येथे आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी सांगितले की, तेली यांच्या कुटुंबियांपैकी एकाला नोकरी आणि हानीभरपाई देण्याची मागणी सरकारकडे पाठवण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदुबहुल देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या लज्जास्पद !