हिंदु युवतीस त्रास देणार्‍या इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी धडा शिकवून पोलिसांच्या कह्यात दिले  !

पोलीस ठाण्यात कारवाई होण्यासाठी उपस्थित प.पू. प्राणलिंग स्वामीजी, सागर श्रीखंडे, तसेच अन्य कार्यकर्ते

निपाणी (कर्नाटक) – येथील इमराम बेग हा निपाणी परिसरात वारंवार हिंदु तरुणींची छेड काढत असल्याची तक्रार विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांकडे  प्राप्त झाली. यानंतर इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवत पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी बेग याच्यावर कलम ११० अन्वये कारवाई केली आहे. समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी या संदर्भात कारवाई होण्यासाठी विशेष लक्ष घातले आणि पोलीस ठाण्यात ते उपस्थित होते.

या कारवाईत सुचित्राताई कुलकर्णी, युवराज जाधव, उत्तम कमते, विकास विश्वकर्मा आणी सागर श्रीखंडे यांनी विशेष लक्ष घालून बेग याच्यावर कारवाई होण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदु युवतींना कुणी जिहादी त्रास देत असेल, तर त्यांनी मातृशक्ती, दुर्गा वाहिनीच्या प्रमुख सुचित्राताई कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.