संभाजीनगर येथे गणपति मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड !

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – शहरातील गणेश टेकडीवरील गणपति मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्‍यात आली आहे. २८ जानेवारी या दिवशी स्‍थानिकांना हा प्रकार कळताच त्‍यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्‍यानंतर बेगमपुरा पोलिसांनी स्‍वत: तक्रारदार होत या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांवर गुन्‍हा नोंद केला आहे. ठाणे अंमलदार शैलेश नलावडे यांनी ही तक्रार प्रविष्‍ट केली आहे. २८ जानेवारी या दिवशी अधिवक्‍ता गोपाल पांडे यांनी पोलिसांना संपर्क करून गणेश टेकडीवरील मंदिराची तोडफोड झाली आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पहाणी केल्‍यानंतर मंदिराची नासधूस झाल्‍याचे आढळले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे संतापजनक आहे. समाजकंटकांना भय नसल्‍यामुळेच मंदिरांंची तोडफोड आणि मंदिरांतील दानपेट्यांच्‍या चोर्‍या होतात, असेच सर्वसामान्‍यांना वाटते. पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी !