पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत मनोज खाडये यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी (उजवीकडील) आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाड्ये (डावीकडील) आणि समोर उपस्थित धारकरी

जुन्नर (जिल्हा पुणे), ३१ जानेवारी (वार्ता.) – हलाल अर्थव्यवस्थेद्वारे हिंदूंच्या खिशातून बलपूर्वक पैसे काढून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत आहे. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात असल्याची माहिती आहे. तरी आपण सर्वांनी संघटित होऊन विरोध केला, तर हलाल अर्थव्यवस्था वाढण्यापासून नक्कीच रोखता येईल. हलालला विरोध करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने न घेण्याचा निर्धार धारकर्‍यांनी केला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत ‘हलाल’संदर्भात मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाड्ये आणि समोर उपस्थित धारकरी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ मोहिमेस २९ जानेवारीला प्रारंभ झाला. यंदाची मोहीम श्रीक्षेत्र भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी अशी होत आहे. या मोहिमेत ३१ जानेवारीला श्री वरसुबाई येथे ते बोलत होते. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनीही धारकर्‍यांना संबोधित केले. या मोहिमेसाठी ५० सहस्र धारकरी उपस्थित आहेत.

३८ सहस्र ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूंच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प आपण करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदु धर्म, हिंदु समाज, हिंदु संस्कृती, तसेच हिंदुस्थान या गोष्टींसाठी वाहिलेले एकमेव वर्तमानपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय ! हे वर्तमानपत्र प्रत्येक हिंदूने वाचले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, व्यक्ती यांच्यापर्यंत ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे. हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे, हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत, ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक सनातन प्रभात पोचले पाहिजे. त्यासाठी ३८ सहस्र ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूंच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करायचा आहे, यासाठी संकल्प करूया.

१ फेब्रुवारीला मोहिमेची सांगता शिवनेरी येथे !

गडकोट मोहिमेचा समारोप १ फेब्रुवारीला शिवनेरी येथे होणार आहे. या मोहिमेला राज्याच्या कानाकोपर्‍यातून, तसेच महाराष्ट्राबाहेरूनही धारकरी सहभागी झाले आहेत.

छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण धारकरी घडवणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात्च गडकोट मोहीम प्रत्येक हिंदूने अनुभवलीच पाहिजे, अशी आहे.