वर्ष २०२२ मध्ये तब्बल १६५ जणांना सुनावण्यात आली फाशीची शिक्षा !

नवी देहली – नॅशनल लॉ विश्‍वविद्यालयाच्या ‘प्रोजेक्ट ३९ ए’ अंतर्गत ‘डेथ पेनाल्टी इन इंडिया, अ‍ॅन्यूअल स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट २०२२’ नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार देशातील सत्र न्यायालयांनी वर्ष २०२२ मध्ये १६५ दोषींना वेगवेगळ्या खटल्यांत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या २० वर्षांमध्ये ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. या १६५ पैकी ३ जणांना बलात्काराच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वर्ष २०२१ मध्ये सत्र न्यायालयांनी १४६ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यांपैकी बाँबस्फोटाच्या एका खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ३८ जणांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

तरीही भारतातील गुन्हेगारी अल्प होण्याऐवजी वाढतच आहे, हे कधी थांबणार ?