आतंकवादाच्या अंत्यसंस्कारात सहस्रो मुसलमानांचा सहभाग !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांच्या उपस्थितीतील संतापजनक प्रकार

आझमगड (उत्तरप्रदेश) – इंडियन मुजाहिदीन या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी शहजाद अहमद हा वर्ष २००८ मधील देहलीतील बाटला हाऊस येथील चकमकीच्या प्रकरणी तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. उपचारांच्या वेळी त्याचा ‘एम्स’ रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आझमगडमधील खलीशपूर येथील त्याच्या गावी आणण्यात आला होता. त्या वेळी त्याच्या अंत्यसंस्कारात सहस्रोच्या संख्येने मुसलमान सहभागी झाले होते. येथे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाटला हाऊस चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांचा मृत्यू झाला होता, तर २ पोलीस घायाळ झाले होते. यात २ आतंकवादी ठार झाले होते.

संपादकीय भूमिका 

आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना न देण्याचाच कायदा करण्याची आवश्यकता आहे ! अशा प्रकारे आतंकवाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालेल्यांची मानसिकता लक्षात घेऊन देशासाठी ते धोकादायक होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे !