पेशावरमधील मशिदीमध्ये आत्मघाती स्फोट : २९ पोलीस ठार, १२० जण घायाळ

पेशावर (पाकिस्तान) – येथील पोलीस लाइन्सधील मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये २९ पोलीस ठार झाले, तर १२० जण घायाळ झाले. घायाळांपैकी ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे मशिदीचा मोठा भाग कोसळला आहे. स्फोटाच्या वेळी मशिदीमध्ये ५५० लोक उपस्थित होते. या आक्रमणाचे दायित्व तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपीने) घेतले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट पुष्कळ शक्तीशाली होता आणि त्याचा आवाज २ किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आत्मघाती आक्रमण करणारा आतंकवादी मधल्या रांगेत उभा होता. येथे प्रवेश करण्यासाठी ‘गेट पास’ दाखवावा लागत असल्याने तो पोलीस लाइन्समध्ये कसा पोचला, हे समजू शकले नाही.