मुसलमानांकडून मशिदीजवळ हिंदु तरुणाची हत्या

गोपालगंज (बिहार) येथील घटना !

  • क्रिकेट खेळण्यावरून झाला होता वाद !

  • मृतदेह मुसलमानांच्या भागातून नेत असतांनाही हिंदूंवर आक्रमण

गोपालगंज (बिहार) – येथील बसडीला गावामध्ये मुसलमानांनी २७ जानेवारीच्या दिवशी भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या अंकित कुमार नावाच्या तरुणाची मशिदीजवळ हत्या केली. मुसलमानांनी त्याचे मित्र रिओम, चंदन कुमार आणि शिवम कुमार यात घायाळ झाले आहेत. अंकित कुमार याचा मृतदेह आरोपींच्या गावातून नेला जात असतांनाही मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी लाठीमार करत नंतर हवेत गोळीबार केला. येथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथे तणावपूर्ण शांतता आहे. क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हा वाद पंचायतीकडून सोडवण्यात आला होता.

१. अंकितच्या हत्येच्या प्रकरणी शहादत मिया, समशेर मिया, सोनू मिया, आरिफ मिया, मुन्ना मिया, आदिल अली, सुभान अहमद, अहमद अली आणि दिलशाद अली यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच काही महिलांसह ३० ते ३५ जणांचाही यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

२. अंकितचे वडील मोहन प्रसाद यांनी सांगितले की, अंकित आणि त्याचे मित्र मशिदीजवळून जात असतांना काही मुसलमानांनी त्यांना घेरले आणि अंकित याला मारहाण चालू केली. तेथील एका घरात नेऊन त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.

३. बिहार पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देतांना ट्वीट केले आहे. यात म्हटले आहे की, बसडीला गावामध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी होऊन अंकित कुमार हा तरुण घायाळ झाला. उपचाराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

  • बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे हिंदुद्वेषी युती सरकार असल्याने हिंदूंची स्थिती पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी तेथील जनतेने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !
  • ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आवई उठवणारे अशा घटनांविषयी नेहमीच मौन बाळगतात !