‘गुळवेल’ या वनस्‍पतीची यज्ञकुंडात आहुती दिल्‍याचे दृश्‍य संगणकीय प्रणालीवर पाहिल्‍यापासून अधून-मधून होणारी पोटदुखी थांबणे

श्री. यशवंत सहस्रबुद्धे

‘९.१२.२०२२ या दिवशी मला संगणकीय प्रणालीच्‍या माध्‍यमातून रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात चालू असलेला याग पहाण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी आमच्‍या समवेत सद़्‍गुरु जाधवकाकाही होते. मागील २ – ३ मासांपासून माझे पोट अधून-मधून दुखत होते. त्‍याकडे मी दुर्लक्ष केले. याग चालू असतांना पृथ्‍वीवरील अमृत असलेल्‍या ‘गुळवेल’ या आयुर्वेदिय वनस्‍पतीची यज्ञकुंडात आहुती दिली, ते पाहिल्‍यापासून माझे पोट दुखायचे थांबले. आता ५ दिवस होऊनही पोट दुखले नाही, यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. यशवंत सहस्रबुद्धे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ६८ वर्षे), जळगाव सेवाकेंद्र. (९.१२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक