हे गुरुदेवा, तुम्‍ही आहात प्रीतीचा अथांग सागर।

साधकांची प्रतिभा जागृत करणारे  सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमाऊली (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), केवळ तुमच्‍या कृपेमुळे मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. नेहा प्रभु

हे गुरुदेवा (टीप), अपराध घडले या जिवाकडून ।
तरी प्रीतीचा वर्षाव करता मजवर ॥ १ ॥

तुम्‍ही आहात प्रीतीचा अथांग सागर ।
तुमच्‍या कृपेस नसे मोजमाप ॥ २ ॥

गुरुदेवा, प्रार्थिते जीव तुमच्‍या चरणी ।
घडावी अखंड साधना ॥ ३ ॥

हे शरणागत वत्‍सला, आले शरण तुजला ।
करावी कृपा मजवर, घडावी अखंड सेवा ॥ ४ ॥

टीप : परात्‍पर गुरु डॉ. आठवले

– तुमच्‍या चरणी येण्‍यास तळमळणारी,

सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२१)