सातारा शहराच्‍या पश्‍चिम भागात रस्‍त्‍यांची चाळण !

भुयारी गटार करण्‍यासाठी रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी खोदकाम

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २० जानेवारी (वार्ता.) – शहराच्‍या पश्‍चिम भागात मनामती चौक, चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, पापाभाई पत्रेवाला चाळ येथे भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. रस्‍त्‍यांचे मध्‍यभागी खोदकाम केल्‍यामुळे या भागांतील सर्व रस्‍त्‍यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे रस्‍त्‍यावर धुळीचे साम्राज्‍य निर्माण झाले असून नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिका

जनतेला मूलभूत सुविधाही वेळेत मिळत नसतील, तर प्रशासन काय कामाचेे ? असा विचार कुणाच्‍याही मनात आल्‍यास चूक ते काय ?