नागपूर येथे रेल्‍वेची धडक बसून तरुणीचा मृत्‍यू !

कानात हेडफोन घातल्‍याने आवाज ऐकू आला नाही

नागपूर – हेडफोन घालून रेल्‍वेचे रूळ ओलांडणार्‍या तरुणीला रेल्‍वेची धडक बसल्‍याने तिचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना १८ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता घडली. मयत विद्यार्थिनी कु. आरती गुरव ही मूळची भंडारा जिल्‍ह्यातील सातोना या गावची आहे. ती डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीईच्‍या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. हिंगणा तालुक्‍यातील टाकळघाट येथे ती मावशीकडे वास्‍तव्‍याला होती. कु. आरती रेल्‍वे फाटक ओलांडतांना भरधाव रेल्‍वे येत असतांना आजूबाजूच्‍या लोकांनी तिला मोठ्याने हाक मारली; पण हेडफोन कानात असल्‍याने तिला काहीच ऐकू आले नाही.