आमदार अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्‍यासह १५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

‘क्रिप्‍टो’च्‍या व्‍यवराहातून धमकावल्‍याचा आरोप !

डावीकडून अर्जुन खोतकर आणि विजय झोल

जालना – क्रिप्‍टो करन्‍सीच्‍या व्‍यवहारात उद्योजक किरण खरात यांना धमकावल्‍याप्रकरणी भारताच्‍या क्रिकेटमधील अंडर १९ संघाचा माजी कर्णधार आणि अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल यांच्‍यासह १५ जणांवर येथील घनासंगी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

किरण खरात यांनी पोलिसांना दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, विजय झोल याने गुंड पाठवून बंदुकीचा धाक दाखवला आहे. विजय यांनी माझे १० दिवसांपूर्वी अपहरण केले होते. मला पुणे येथून जालना येथे आणल्‍यानंतर माझे घर आणि प्‍लॉट हे बंदुकीच्‍या धाकावर माझ्‍याकडून नोंदणी करून घेतले आहे. क्रिप्‍टो करन्‍सीच्‍या माध्‍यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली होती; मात्र करन्‍सीचे बाजारमूल्‍य घसरले. त्‍यामुळे मलाच दोषी ठरवत विजय झोल आणि त्‍याचा भाऊ यांनी काही गुंड माझ्‍या घरी पाठवून मला ठार करण्‍याची धमकी दिली.