देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या जुन्‍या इमारतीच्‍या सज्‍जावर ४ – ६ कबुतरे प्रतिदिन सकाळपासून येत असून ती ध्‍यान लावून बसत असल्‍याचे जाणवणे

सौ. स्नेहा हाके

‘देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या जुन्‍या इमारतीच्‍या तिसर्‍या मजल्‍यावरील सज्‍जावर ४ ते ६ कबुतरे प्रतिदिन सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत बसलेली असतात. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘मी त्‍यांना गेल्‍या दीड वर्षांपासून पहात आहे. ‘ती ध्‍यान लावून बसलेली असतात’, असे वाटते.’’

याविषयी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले, ‘‘कबुतर येणे चांगले आहे.’’

– सौ. स्नेहा हाकेे (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय २६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.८.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधक व संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक