भारतातील सर्वांत जुना खटला ७२ वर्षांनी निकाली !

कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयात वर्ष १९५१ मधील एक खटला मागील आठवड्यात निकाली निघाला. तब्बल ७२ वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी चालू होती. बरहामपूर बँक लिमिटेडच्या कर्जाविषयी हा खटला होता.

या न्यायालयाच्या विद्यमान मुख्य न्यायाधिशांचा जन्म हा खटला प्रविष्ट झाल्यानंतर साधारण एका दशकानंतर झालेला आहे. या खटल्याप्रमाणेच वर्ष १९५२ मध्ये प्रविष्ट करण्यात आलेले आणखी ५ असेच जुने खटले आहेत. यांतील २ खटले हे दिवाणी असून ते बंगालच्या मालदा न्यायालयात प्रलंबित आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर १९४८ या दिवशी बरहामपूर बँकेला दिवाळखोर घोषित करत ही बँक बंद करण्याचा आदेश दिला होता; मात्र ठेवीदारांनी त्यांचे पैसे परत मिळण्याची मागणी करत न्यायालयाच्या या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

संपादकीय भूमिका

७२ वर्षांनी निकाल लागण्याला कुणी ‘न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणू शकतो का ?