परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी आणि सत्‍संग झाल्‍यानंतर साधिकेला आलेल्‍या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१. सत्‍संग

मला प.पू. गुरुदेवांच्‍या भोवती प्रखर पिवळा प्रकाश दिसला. ‘त्‍यांचे दर्शन परत परत घ्‍यावे’, असे मला वाटत होते.

२. सत्‍संग झाल्‍यानंतर

अ. सत्‍संग झाल्‍यानंतर बराच वेळ मी वेगळ्‍या स्‍थितीत होते. ‘मी अजूनही चैतन्‍याच्‍या वलयातच आहे’, असे मला वाटत होते.

आ. मी जिन्‍यावरून जात असतांना मला पायर्‍यांचा स्‍पर्श जाणवत नव्‍हता. ‘मी अधांतरी चालत आहे’, असे मला जाणवत होते. माझे मलाच आश्‍चर्य वाटत होते. मी ते अनुभवण्‍यात अतिशय स्‍तब्‍ध झाले होते.

इ. ‘मी वेगळ्‍याच अवस्‍थेत आहे’, हे माझ्‍या शेजारील साधिकेच्‍याही लक्षात आले. ती मला म्‍हणाली, ‘‘तुम्‍हाला अकस्‍मात् काय झाले ? तुम्‍ही एकदम शांत का झाला आहात ?’’ तेव्‍हा मी म्‍हणाले, ‘‘मलाच समजत नाही. मी जिन्‍यावरून चालत आहे; पण मला पायर्‍यांचा स्‍पर्श जाणवत नाही.’’

गुरुदेवा, तुम्‍ही या अनुभूती दिल्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक