जोशीमठ गाव १२ दिवसात ५.४ सेंटीमीटर धसले !

इस्रोच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून उघड !

इस्रोच्या उपग्रहाद्वारे घेतलेले जोशीमठचे छायाचित्र

जोशीमठ (उत्तराखंड) – जोशीमठ गाव गेल्या १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटरने  धसले आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्राद्वारे समोर आली.

‘इस्रो’ची संस्था ‘नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर’ने म्हटले आहे की, २७ डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत जोशीमठ ५.४ सेमी धसले आहे. याआधीही एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जोशीमठ ९ सेंटीमीटरने धसले गेले होते. डिसेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जोशीमठ वेगाने धसू लागले.