हिंदूंनी घरात पूजेसाठी तलवार ठेवावी !  

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचे हिंदूंना आवाहन !

प्रमोद मुतालिक

 कलबुर्गी (कर्नाटक) – श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री प्रमोद मुतालिक यांनी हिंदूंना त्यांच्या घरात पूजेसाठी तलवार ठेवण्याचे आवाहन केले. घरात पूजेसाठी तलवार ठेवणे, हा गुन्हा नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. येथील यादरामी भागात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

श्री. प्रमोद मुतालिक पुढे म्हणाले की, दुसर्‍या कुणावर आक्रमण करण्यासासाठी नाही, तर देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी घरात तलवार ठेवली पाहिजे. जर पोलीस तुमच्या घरी आले आणि त्यांनी तलवारीविषयी विचारणा केली, तर तुम्ही सांगायला हवे की, हिंदूंच्या देवतांवर, म्हणजे श्री दुर्गादेवी, श्री महाकालीदेवी, भगवान श्रीराम आदींवर त्यांनी शस्त्र बाळगले; म्हणून गुन्हा नोंदवा. हिंदु धर्मातील लोक शस्त्रांची पूजा करत होते. आता आपण ग्रंथ, लेखणी, वाहन आदींची पूजा करतो. पोलीसही बंदुकीची पूजा करतात, ते कागदपत्रांची पूजा करत नाहीत.

प्रतिकात्मक चित्र

याच प्रमाणे घरात शस्त्र ठेवले पाहिजे. त्याची पूजा केली पाहिजे. जर घरात तलवार ठेवली, तर कुणी हिंदूंच्या महिलांचे शोषण करण्याचे धाडस करणार नाही.