अमेरिकेने ‘सायबर’ आक्रमणाची शक्यता फेटाळली !

संगणकीय प्रणालीतील बिघाडामुळे अमेरिकेची विमानसेवा कोलमडल्याचे प्रकरण

वॉशिंग्टन – अमेरिकेत नागरी विमानवाहतूक प्रशासनाच्या ‘नोटिस टू एयर मिशन’ या संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्यामुळे ११ जानेवारी २०२३ या दिवशी संपूर्ण अमेरिकेची विमानसेवा कोलमडली. त्यामुळे १ सहस्र ३०० विमानांची उड्डाणे रहित करण्यात आली.

संगणक प्रणालीतील हा बिघाड हे ‘सायबर’ आक्रमण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतांनाच अमेरिकेने एक निवेदन प्रसिद्ध करून ही शक्यता फेटाळून लावली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तांत्रिक विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.