नारायणांच्‍या स्‍मरणमात्रे लाभे उच्‍च कोटीचा आनंद ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

नारायणांच्‍या (टीप) चरणी राहूनी मिळे शांती ।
तेच असती मनाचे अधिपती ॥ १ ॥

श्री. देवदत्त व्हनमारे

नारायणांच्‍या दर्शने लाभे अद्वैताची अनुभूती ।
तेच असती जिवाचे अधिपती ॥ २ ॥

नारायणांच्‍या दर्शने मिळे सौख्‍य जिवा ।
त्‍यांच्‍याच अपार कृपेने लाभे त्‍यांची चरणसेवा ॥ ३ ॥

नारायणांच्‍या स्‍मरणमात्रे क्षणात नष्‍ट होई विचार अन् विकल्‍प ।
त्‍यांच्‍या स्‍मरणमात्रे लाभे उच्‍च कोटीचा आनंद ॥ ४ ॥

असे हे जगत्‌पालक नारायण । अखंड राहो हृदयमंदिरात ।
त्‍यांच्‍या या लेकराला मिळो, त्‍यांच्‍या चरणी स्‍थान ॥ ५ ॥

टीप : परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या

– कु. देवदत्त व्‍हनमारे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १७ वर्षे), सोलापूर (२५.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक