१२० महिलांवर बलात्कार करणार्‍या जिलेबी बाबाला १४ वर्षांचा कारावास !

आरोपी जिलेबी बाबा उपाख्य अमर पुरी पोलिसांसमवेत

फतेहाबाद (हरियाणा) – येथे १२० महिलांवर बलात्कार करणार्‍या जिलेबी बाबा उपाख्य अमर पुरी याला न्यायालयाने १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अमली पदार्थ असणारा चहा पाजून तो महिलांना गुंगी आणून त्यांच्यावर बलात्कार करत होता. अल्पवयीन मुलीवर २ वेळा बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत १४ वर्षे, तर महिलांवरील बलात्काराच्या कायद्यांर्तगत ७ वर्षे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. अमर पुरी हा महिलांचे नग्न व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. पोलिसांना त्याच्या भ्रमणभाषमध्ये १२० अश्‍लील व्हिडिओ आढळले. त्यात तो महिलांशी शारीरिक संबंध ठेवतांना दिसून आले.

पोलिसांच्या चौकशीत जिलेबी बाबाने त्याच्याकडे उपचारांसाठी येणार्‍या महिलांवर नशेची गोळी देऊन बलात्कार केल्याची स्वीकृती दिली होती. अपकीर्तीच्या भीतीने महिलांना बलात्काराची गोष्ट कुठेही सांगता येत नव्हती. १३ ऑक्टोबर २०१७ या दिवशी एका महिलेने धाडस करून त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीचीच शिक्षा होणारा कायदा असण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !