चोर अनीस याला पकडल्यावर त्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात देहलीच्या पोलिसाचा मृत्यू !

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभु दयाल

देहली – येथील चोर अनीस याला पकडून पोलीस ठाण्यात नेत असतांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभु दयाल यांच्यावर अनीस याने चाकूद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात दयाल घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ते मुळचे राजस्थानमधील सीकर येथील रहाणारे होते. पोलिसांनी अनीस याला अटक केली आहे.

देहलीतील एक महिलेने चोरीची तक्रार केल्यावर शंभु दयाल हे अनीस याला पकडण्यासाठी गेले होते. त्यांनी अनीस याला पकडले. त्या वेळी त्याने संधी मिळताच खिशात लपवलेला चाकू बाहेर काढून दयाल यांच्यावर वार केले. तरीही दयाल यांनी अनीस याला सोडले नाही.

संपादकीय भूमिका

या घटनेविषयी आता एकही निधर्मीवादी बोलणार नाही ! पोलिसांवरही आक्रमण करण्यास धर्मांध मागे पुढे पहात नाहीत, तसेच ते सतत शस्त्रसज्ज असतात, हे लक्षात घ्या !