इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनातील २ तरुणांना देण्यात आली फाशी !

प्रतिकात्मक छायाचित्र

तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या काही मासांपासून हिजाबविरोधी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा, तर शेकडो जणांना कारावासात डांबण्यात आले आहे. आता याच प्रकरणी महंमद मेहदी करामी आणि सैयद महंमद हुसेनी या २ तरुणांना फाशी देण्यात आली आहे. आंदोलनाच्या वेळी एका सुरक्षा अधिकार्‍याची हत्या केल्याचा या दोघांवर आरोप होता. या प्रकरणात अन्य तिघांना फाशीची, तर ११ जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांत १० हून अधिक लोकांना फाशी दिली आहे.