भाग्‍यनगर येथील पशूवधगृहाकडे १२ बैलांना घेऊन जाणारा टेंपो पकडला !

केज (जिल्‍हा बीड) – भाग्‍यनगर येथील पशूवधगृहाकडे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी केज परिसरात पकडला. हा टेंपो केजमार्गे १२ बैलांना घेऊन भाग्‍यनगर येथे जात होता. या प्रकरणी शेख जाफर शेख अहमद जव्‍हर आणि अमोल पावले यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी याविषयी चौकशी केली असता १२ बैल नेकनूर येथील व्‍यापारी शौकत बाबामियाँ कुरेशी यांनी भरून दिले असून त्‍यांच्‍या सांगण्‍यावरून भाग्‍यनगर येथे नेत असल्‍याचे चालकाने सांगितले. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.