सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘स्‍पिरिच्‍युअल पाथ’ आणि ‘स्‍पिरिच्‍युअल क्‍वालिटी’ या शब्‍दांचा सांगितलेला भावार्थ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ५.६.२०२२ या दिवशी त्‍यांनी एका सत्‍संगात साधकांना इंग्रजी भाषेत केलेल्‍या मार्गदर्शनाची ध्‍वनीचित्र-चकती दाखवण्‍यात आली. त्‍या संदर्भात पू. वामन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

१. पू. वामन यांनी ‘स्‍पिरिच्‍युअल पाथ’, म्‍हणजे नारायणाकडे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याकडे) जाण्‍याचा मार्ग’, असे सांगणे

पू. वामन राजंदेकर

पू. वामन : सद़्‍गुरु मावशी (टीप १), मी आता नारायणांचा इंग्‍लीश सत्‍संग पाहिला.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : अरे वा ! पू. वामन, तुम्‍हाला इंग्रजी भाषा समजते का ?

पू. वामन : हो.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : पू. वामन, स्‍पिरिच्‍युअल पाथ (spiritual path) म्‍हणजे काय ?

पू. वामन : नारायणाकडे (टीप २) जाण्‍याचा प्रयत्न (मार्ग).

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : अरे वा ! किती सुंदर सांगितले. बरोबर आहे.

२. पू. वामन यांनी ‘स्‍पिरिच्‍युअल क्‍वालिटी’, म्‍हणजे नारायणाचे रूप, म्‍हणजे त्‍यांच्‍यासारखे होणे’, असे सांगणे

सौ. मानसी राजंदेकर

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : पू. वामन, ‘स्‍पिरिच्‍युअल क्‍वालिटी’(spiritual quality) म्‍हणजे काय ?

पू. वामन : नारायणाचे रूप, म्‍हणजे त्‍यांच्‍यासारखे होणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : हो. पू. वामन, किती सुंदर आणि योग्‍य उत्तर दिले. गुण वाढवणे, म्‍हणजे त्‍यांच्‍यासारखे होणेच आहे.

पू. वामन : हे सर्व नारायण मला सांगतात.

टीप १ :  पू. वामन श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘सद़्‍गुरु मावशी’ म्‍हणतात.

टीप २ : पू. वामन परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ‘नारायण’ म्‍हणतात.

कृतज्ञता !’

– सौ . मानसी राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), फोंडा, गोवा (७.६.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक