साधक आणि धर्मप्रेमी यांना प्रेमाने साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना आनंद देणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम !

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील साधकांच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम

१. कु. पूजा दीपक धुरी, तालुका कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग.

१ अ. सहजतेने परिस्‍थिती स्‍वीकारता येण्‍यासाठी मार्गदर्शन करून आनंद देणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम ! : ‘काही दिवसांपूर्वी मी अन्‍य जिल्‍ह्यामध्‍ये सेवेला जाण्‍याचे नियोजन करत होते; परंतु काही अडचणींमुळे मला जाता आले नाही. हे मी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांना कळवल्‍यावर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘या जिल्‍ह्यात राहूनच छान सेवा कर !’’ तेव्‍हा माझे मन पुष्‍कळ कृतज्ञतेने भरून आले. ‘सद़्‍गुरु सत्‍यवानदादांनी मला साधना आणि सेवा यांसाठी आशीर्वादच दिला’, या कृतज्ञताभावाने माझ्‍याकडून पुढच्‍या सेवा होऊ लागल्‍या.

१ आ. साधकांच्‍या कुटुंबियांनाही आधार देणारे सत्‍यवानदादा ! : एकदा माझ्‍या मोठ्या भावाला (श्री. दत्तगुरु धुरी) वारंवार उचकी येण्‍याचा त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी ‘ही काविळीची लक्षणे आहेत’, असे सांगितले होते. दादाच्‍या आजारपणामुळे घरामध्‍ये भीती आणि तणाव निर्माण झाला होता. वैद्यकीय आणि घरगुती उपचार करूनही त्‍याला बरे वाटत नव्‍हते. तेव्‍हा ‘हा आध्‍यात्मिक त्रास आहे’, असे आमच्‍या लक्षात आले. मी सद़्‍गुरु सत्‍यवानदादांना संपर्क करून सर्व स्‍थिती सांगितली. त्‍यांनी लगेच दादासाठी नामजपादी उपाय शोधून दिले. उपाय केल्‍यावर दादाला दोनच दिवसांत बरे वाटले. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांच्‍या माध्‍यमातून ‘केवळ साधकांचीच नाही, तर साधकांच्‍या कुटुंबियांचीही देव कशी काळजी घेतो ?’, हे मला अनुभवता आले.

१ इ. धर्मप्रेमींच्‍या मनात आदराचे स्‍थान मिळवलेले सद़्‍गुरु सत्‍यवानदादा !

१ इ १. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांनी कार्यशाळेच्‍या मधल्‍या वेळेत धर्मप्रेमींशी अनौपचारिक संवाद साधणे आणि त्‍यातून धर्मप्रेमींना पुष्‍कळ आनंद मिळणे : २०.२.२०२२ या दिवशी जिल्‍ह्यामध्‍ये कार्यशाळा झाली. त्‍या वेळी साधकांना सद़्‍गुरु सत्‍यवानदादांचा सत्‍संग लाभला. कार्यशाळेच्‍या मधल्‍या वेळेत सद़्‍गुरु सत्‍यवानदादांनी धर्मप्रेमींशी अनौपचारिक संवाद साधला. त्‍यानंतर एक धर्मप्रेमी युवती मला म्‍हणाली, ‘‘आज मी पहिल्‍यांदाच सद़्‍गुरु सत्‍यवानदादांना प्रत्‍यक्ष पाहिले. मला त्‍यांचे दर्शन झाले आणि ते माझ्‍याशी बोललेही.’’ हे सांगतांना तिची भावजागृती झाली. त्‍यातून मला सद़्‍गुरु सत्‍यवानदादांमधील प्रीती अनुभवता आली.

१ इ २. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांविषयी समाजातील धर्मप्रेमींच्‍या मनात असलेला आदरभाव ! : प्रत्‍यक्ष कार्यशाळा ज्‍या ठिकाणी आयोजित केली होती, त्‍या मंगल कार्यालयाच्‍या मालकांना कार्यशाळा संपल्‍यानंतर आम्‍ही भेटायला गेलो होतो. त्‍यांच्‍याशी अनौपचारिक बोलतांना ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘तुमचे सद़्‍गुरु आले होते का ? पूर्वी मी त्‍यांना भेटलो आहे. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे पाहून मला चांगले वाटले होते. त्‍यांनी ‘ही जागा सकारात्‍मक (पॉझिटिव्‍ह) आहे’, असे मला सांगितले होते.’’ यातून ‘धर्मप्रेमींच्‍या मनात सद़्‍गुरु सत्‍यवानदादांप्रती किती आदरभाव आहे’, हे मला अनुभवता आले. ‘सद़्‍गुरु आणि संत सर्वांवरच भरभरून प्रीती करतात’, याची मला प्रचीतीच आली.

सद़्‍गुरु सत्‍यवानदादांना साधकांच्‍या प्रगतीचाच निरंतर ध्‍यास असतो. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांच्‍या रूपात आम्‍हाला साक्षात् प.पू. गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्‍तित्‍व अनुभवता येते. त्‍याबद्दल गुरुमाऊली आणि सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. कु. भक्‍ती पांगम-नेमळे, तालुका सावंतवाडी, जिल्‍हा सिंधुदुर्ग

कु. भक्‍ती पांगम-नेमळे

२ अ. धर्मप्रेमींना आवडेल आणि रुचेल अशा पद्धतीने प्रेमाने साधना करायला सांगणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम ! : ‘एकदा मला सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांच्‍या समवेत एका धर्मप्रेमींना संपर्क करायला जाण्‍याच्‍या सेवेची संधी मिळाली. तेव्‍हा मला सद़्‍गुरु सत्‍यवानदादांची प्रीती अनुभवता आली. त्‍यांना त्‍यांच्‍या ‘संपर्कात आलेल्‍या प्रत्‍येक जिवाचा उद्धार व्‍हावा’, अशी पुष्‍कळ तळमळ आहे. ‘धर्मप्रेमींना साधनेतील आनंद अनुभवता यावा’, यासाठी ते धर्मप्रेमींना आवडेल आणि रुचेल, अशा पद्धतीने अत्‍यंत प्रेमाने मार्गदर्शन करतात.’

३. कु. नीना कोळसुलकर, खारेपाटण, जिल्‍हा सिंधुदुर्ग.

३ अ. कुडाळ सेवाकेंद्रात रहातांना जाणवलेली सूत्रे

१. ‘ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये मी काही दिवसांसाठी कुडाळ सेवाकेंद्रात रहायला गेले होते. तेव्‍हा मला सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचे चैतन्‍यमय मार्गदर्शन लाभले.

२. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा आमचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घ्‍यायचे. तेव्‍हा ‘ते मारुतिरायांसारखे दास्‍यभावात आहेत’, असे मला जाणवायचे.

३. समाजातील संत आणि गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांचे प्रतीरूप असणारे सनातनचे मौल्‍यवान रत्नरूपी संत यांच्‍यात मला पुष्‍कळ भेद जाणवतो.

४. खारेपाटण हे गाव मोठे आहे; पण गावात साधकसंख्‍या अत्‍यल्‍प आहे. ‘सद़्‍गुरु सत्‍यवानदादांचे मार्गदर्शन आणि त्‍यांची कृपा यांमुळेच माझी साधना चालू असून त्‍यांनीच मला साधनेत टिकवून ठेवले आहे’, असे मला जाणवते.

३ आ. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा आमच्‍यासमोर आल्‍यावर वार्‍याची मोठी झुळूक येऊन संपूर्ण शरीर थंड होणे : सिंधुदुर्गमध्‍ये कार्यशाळा झाली. त्‍यातील प्रायोगिक भागामध्‍ये बसल्‍यावर मला पुष्‍कळ उकडत होते आणि घामही येत होता. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा आम्‍हाला मार्गदर्शन करण्‍यासाठी आमच्‍यासमोर आल्‍यावर वार्‍याची मोठी झुळूक येऊन माझे संपूर्ण शरीर थंड झाले.

‘भगवंताच्‍याच कृपेने मला त्‍यांचे गुणगान करण्‍याची संधी मिळाली’, याबद्दल मी गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आणि सद़्‍गुरु सत्‍यवानदादा यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

४. श्री. गणेश धुरी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), साळगाव, तालुका कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग.

श्री. गणेश धुरी

४ अ. अनुभूती

१. ‘१७.२.२०२२ या दिवशी झालेल्‍या माझ्‍या विवाहानिमित्त सद़्‍गुरु सत्‍यवानदादा आले होते. त्‍यांच्‍या केवळ येण्‍याने समारंभामधील वातावरणात चैतन्‍य निर्माण झाले.

२. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांच्‍या रूपात मला गुरुदेवांचेच दर्शन झाले आणि माझा भाव जागृत झाला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १६.३.२०२२)


सद़्‍गुरु चरणी लीन आम्‍ही होतो ।

कु. पुजा धुरी

निर्मळ निरागस हास्‍य असे मुखमंडलावरी ।
सद़्‍गुरु रूपातूनी गुरुमाऊली येत असे साधकांच्‍या घरी ॥ १ ॥

कष्‍ट होता साधकांना, कष्‍टातून बाहेर काढण्‍याचा ध्‍यास धरी ।
अशी ही सद़्‍गुरु माऊली साधकांवर नामजपादी उपाय करी ॥ २ ॥

सद़्‍गुरु दादांच्‍या (टीप) सहवासात गुरुभेटीचा आनंद मिळतो ।
दुःख, क्‍लेश, व्‍याधी यांचा काळ संपतो ॥ ३ ॥

सद़्‍गुरु चरणी लीन आम्‍ही होतो ।
शरणागतभावाने चरण त्‍यांचे धरतो ॥ ४ ॥

कृपा व्‍हावी आम्‍हा लेकरांवर, ध्‍यास लागावा गुरुचरणांचा ।
आनंद घेता यावा आम्‍हा भवसागर पार करण्‍याचा ॥ ५ ॥

टीप : सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

– कु. पूजा दीपक धुरी, तालुका कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग.