सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘प्रतिमा येते साधनेत आड वारंवार ।
गुरुचरणांविना नसे आम्हा दुजा आधार ॥ १ ॥
‘प्रतिमा’ आहे आध्यात्मिक उन्नतीतील अडसर ।
‘गुरुचरणांखालील धूलिकण’ समजण्या हाच खरा अवसर ॥ २ ॥
गुरुचरणांखाली असता होते संकटांपासून रक्षण ।
स्वबळे खरंच होईल का हो आपुले रक्षण ? ॥ ३ ॥
गुरुचरणांखाली असता लाभे साधनेची ऊर्जा अपार ।
‘स्व-तपे स्वत:ला उद्धरू’, हा तर वेडा निर्धार ॥ ४ ॥
गुरुचरणांखाली असता सेवेसाठी लाभे भावाचा आधार ।
‘स्वबुद्धी योगे परिपूर्ण सेवा होईल’, हा अभिमान निराधार ॥ ५॥
यास्तव गुरुमाऊली, चरणांखाली सदैव स्थिर आम्हा ठेवा ।
‘हा भाव राहो जन्मोजन्मी’, हाच आशीष आम्हा द्यावा ॥ ६ ॥’
– (पू.) संदीप आळशी (८.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |