‘मी एका पतसंस्थेची कायदेशीर सल्लागार (समुपदेशक) म्हणून काम पहाते. ‘माझ्याकडे गृहकर्जासाठी तारण म्हणून देण्यात येणार्या सदनिका कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत का ?’, हे तपासून ‘पतसंस्था कर्ज देऊ शकते का ?’, याविषयी ‘सर्च रिपोर्ट’, म्हणजे पडताळणी अहवाल (भूमीसंदर्भात कायदेविषयक इतिहास आणि भूमीची मालकी किंवा भूमीवर असलेले कर्ज यांसंबंधातील तपशील या अहवालात सर्वसाधारणपणे असतो.) देण्याचे दायित्व आहे. अनेकदा आपण ‘कामातून साधनेसाठी वेळ मिळत नाही’, असे म्हणतो; परंतु तसे नसून ‘साधना म्हणून देवाच्या अनुसंधानात राहून कामे केल्यावर कामे कशी होतात ?’, हे मी प्रत्येक वेळी अनुभवले. ‘व्यावहारिक कामे करत असतांना मला साधनेचा कसा लाभ झाला ?’, याबद्दल भगवंताने मला जे अनुभवायला दिले, ते त्याच्याच चरणी अर्पण करते.
मृत्यूपूर्वी ‘माझा देह दान करा’, असे सांगणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा लिंगदेह ‘मला धर्मानुसार अग्नि द्या’, असे सांगत असल्याचे जाणवणे‘मला परिचित असणार्या एका प्रतिष्ठित गृहस्थांचे निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी ‘माझा देह दान करा’, असे कुटुंबियांना सांगितले होते. मी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन घरी आल्यावर मला त्यांचा लिंगदेह दिसू लागला आणि तो सांगू लागला, ‘माझा देह दान करू नका. त्याला धर्मानुसार अग्नि द्या’, असे माझ्या घरच्यांना सांगा.’ त्या वेळी ‘हे काय घडत आहे ?’, ते माझ्या लक्षात येत नव्हते. खरे-खोटे कळत नव्हते. त्या वेळी मी त्या लिंगदेहाला सांगितले, ‘‘दत्तगुरूंना शरण जा आणि त्यांना प्रार्थना करा.’’ – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी (५.४.२०२२) |
१. कर्ज देण्याचा निर्णय घेण्यासाठी देवाला प्रार्थना केल्यावर योग्य दिशा मिळणे
१ अ. ‘पक्षकाराला कर्ज देऊ नये’, असे वाटतांना अधिकार्यांसमोर कर्ज न देण्याचे कारण सिद्ध करता न येणे आणि त्या वेळी देवालाच साहाय्यासाठी प्रार्थना करणे : वर्ष २०१६ मध्ये एका व्यक्तीला परदेशी जाण्यासाठी कर्ज हवे होते. त्या वेळी असलेल्या मुख्य व्यवस्थापकांनी (मॅनेजरने) त्या व्यक्तीला कर्ज देण्याची सर्व सिद्धता केली होती. ‘काहीतरी गडबड आहे. याला कर्ज द्यायला नको’, असे देव मला आतून सुचवत होता; पण माझ्याकडे तपासण्यासाठी आलेली कागदपत्रे पहाता ती कागदपत्रे ‘कर्ज देऊ नये’, हे सांगायला पुरेशी नव्हती. ‘मला या प्रसंगात नेमके काय करायचे ?’, ते लक्षात येत नव्हते. मी कर्ज देण्यास अनुमती देत नाही; म्हणून मुख्य व्यवस्थापकांनी माझ्या विरोधात संचालकांचे मन कलुषित केले. त्याचा परिणाम म्हणून तो पक्षकार, संचालक आणि मी अशी एक बैठक ठेवण्यात आली. ‘बैठकीमध्ये बसल्यावरही त्या व्यक्तीला कर्ज देण्यात येऊ नये’, असे दर्शवणारे कोणतेच कागद माझ्याकडे नव्हते. मी देवाला सतत सांगत होते, ‘देवा, या व्यक्तीला कर्ज द्यायला नको’, असे मला वाटते; पण या संचालकांसमोर ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणतेच पुरावे नाहीत. आता तूच बघ. तू ये आणि तूच सुचव. मी असमर्थ आहे.’
१ आ. कर्जदार तारण म्हणून दाखवत असलेली जागा अनधिकृत असल्याचे लक्षात आल्यावर त्या जागेवर कर्ज देणे कायदेशीर नसल्याचे सांगता येणे : त्याच वेळी त्या व्यक्तीने बैठकीत एक ओळखपत्र दाखवले. मला त्यावरील बाकी काहीच दिसले नाही; पण नगर परिषदेचा शिक्का दिसला. त्यावरून तो तारण म्हणून दाखवत असलेली जागा अनधिकृत असून यावरील अतिक्रमण कधीही हटवले जाईल, हे लक्षात आले. ‘तो कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून दाखवत असलेली जागा अनधिकृत होती’, हे स्पष्ट झाले. ‘हेच सूत्र संचालकांसमोर मांडून त्याला कर्ज देणे कसे कायदेशीर नाही ?’, हे मी पटवून देऊ शकले.
यानंतर मी प्रत्येक धारिका (फाईल) आल्यावर ‘देवा, यातून माझी साधना होऊ दे’, अशीच प्रार्थना करते. नंतर याच व्यवस्थापकांना त्यांच्या अयोग्य वर्तनामुळे नोकरी सोडावी लागली.
२. ‘केवळ धारिका पाहून व्यक्तीला कर्ज देऊ नये’, असे वाटणे आणि ती व्यक्ती खरेच फसवणारी असल्याचे लक्षात येणे
२ अ. ‘पतपेढीकडून आलेल्या कर्ज देण्याविषयीची धारिका हाती घेतल्यावर अस्वस्थ होऊन ‘या व्यक्तीला कर्ज देऊ नये’, असे वाटणे : एका प्रसंगात पतपेढीतून माझ्याकडे पडताळण्यासाठी एक धारिका (फाईल) आली. ८ दिवस झाले, तरी ती धारिका पडताळली जात नव्हती. वाचायला घेतल्यावर अस्वस्थ वाटायचे आणि ‘या व्यक्तीला कर्ज द्यायला नको. ही व्यक्ती फसवणारी वाटते’, असे विचार माझ्या मनात यायचे. याच कालावधीत नवीन मुख्य व्यवस्थापक (मॅनेजर) बाईंशी माझी चांगली मैत्री झाली होती. मी त्यांना मला जाणवलेला भाग सांगितला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘संबंधित व्यक्ती सांगते, ‘अंबरनाथ येथे तिच्या ३ – ४ सदनिका आहेत.’ त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘मला वाटले, ते सांगितले. तुम्ही निर्णय घेऊ शकता.’’
२ आ. अन्य अधिकोषातील अधिकारी व्यक्तीकडून कर्ज घेणारी व्यक्ती फसवी असल्याचे समजल्यावर मुख्य व्यवस्थापकांनी त्या व्यक्तीस कर्ज देण्यास नाकारणे : त्यानंतर मी २ दिवसांनी पतपेढीत गेल्यावर मुख्य व्यवस्थापकांनी मला सांगितले, ‘‘काल ती कर्ज मागणारी व्यक्ती पतसंस्थेत आली होती. त्या वेळी दुसर्या एका अधिकोषातील (बँकेतील) एक अधिकारी तिथे आले होते. त्या अधिकारी व्यक्तीने त्या कर्ज मागणार्या व्यक्तीविषयी व्यवस्थापकांजवळ विचारणा केली आणि सांगितले, ‘‘ही व्यक्ती फसवणूक करणारी असून ती अनेक घरे असल्याचे दाखवते आणि अधिकोषांना (बँक) व्यवहारात फसवते.’’ त्यांच्या सांगण्यानुसार मुख्य व्यवस्थापकांनी त्या व्यक्तीस कर्ज देण्यास नाकारले.
केवळ धारिका पाहून माणसाला ओळखले; म्हणून मुख्य व्यवस्थापकांनी माझे कौतुकही केले. हे सगळे देवाच्या कृपेने शक्य झाले.
३. प्रथम भेटीतच कर्ज मागणारी व्यक्ती पतसंस्थेपासून काहीतरी लपवत असल्याचे लक्षात येणे आणि त्या व्यक्तीवर ३० लाख रुपयांचे कर्ज असल्याचे स्पष्ट होणे
३ अ. ‘कर्ज घेणारी व्यक्ती लाखो रुपयांची मासिक उलाढाल करते’, असे भासवून फसवत आहे’, असे लक्षात येऊनही कर्ज देण्याचे नाकारता न येणे : आमच्या शेजारच्या गावातील एक व्यक्ती कर्ज घेण्यासाठी आली होती. त्या व्यक्तीला प्रथम भेटीतच पाहून ‘ही व्यक्ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. हिला कर्ज दिले, तर पतसंस्थेला तोटा होईल’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. ती व्यक्ती नेहमी अनेक लाख रुपयांचे धनादेश घेऊन पतसंस्थेत यायची आणि म्हणायची, ‘‘बघा, हे इतके रुपये माझे येणे होते, ते आले’’, तरीही ‘त्या व्यक्तीला कर्ज देऊ नये’, असेच मला वाटायचे. ती व्यक्ती त्याच्या शेतभूमीवर कर्ज काढत होती. सर्वसाधारणपणे शेतभूमीचा सातबाराचा उतारा ‘ऑनलाईन’ उपलब्ध होतो. त्यामुळे त्या भूमीवर कर्ज असल्याचे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे मी सदर व्यक्तीला कर्ज देण्याचे नाकारू शकत नव्हते; परंतु मी ते सूत्र लक्षात ठेवले.
३ आ. ‘सर्च रिपोर्ट’ (पडताळणी अहवाल) बनवतांना त्या व्यक्तीवर आधीपासूनच ३० लाख रुपयांचे कर्ज असल्याचे लक्षात येणे आणि पतसंस्थेने त्या व्यक्तीला कर्ज देण्याचे टाळणे : अनेक संचालक त्याला कर्ज देण्याच्या सिद्धतेत होते. एक पर्याय म्हणून आम्ही त्यांचे घर पाहिले. मला घरातही चांगली स्पंदने वाटत नव्हती. मी मुख्य व्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिले, ‘‘यांची मासिक उलाढाल काही लाख रुपयांमध्ये आहे; पण याच्या घराला साधा गिलावाही नाही. मला गडबड वाटते.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी ‘सर्च रिपोर्ट’ देते. तुम्ही निर्णय घ्या.’’ त्या वेळी ‘देवा, तुला काय अपेक्षित आहे ? तेच होऊ दे’, अशी मी प्रार्थना करत होते. देवाच्या कृपेने ‘सर्च रिपोर्ट’ बनवतांना ‘त्या व्यक्तीने आधीच अन्य एका अधिकोषातून ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ही गोष्ट तो पतसंस्थेपासून लपवत होता’, हे लक्षात आले. या ‘सर्च रिपोर्ट’च्या आधारावर पतसंस्थेने कर्ज देणे टाळले. देवाच्या कृपेने हा प्रसंग टाळता आला.
या प्रसंगानंतर देवाच्याच कृपेने सर्व संचालक आणि सहकारी वर्ग यांचा माझ्यावरचा विश्वास वाढला. कर्ज घेणारी व्यक्ती कितीही मोठी असली, तरीही संचालक त्यांना सांगतात, ‘‘आमच्या कायदेशीर सल्लागारांनी कागदपत्रे पाहून होकार दिल्याविना प्रकरण पुढे जाणार नाही.’’(एकदा वरील प्रसंग मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘लिंगदेह आपल्याला असे सांगत असतात. तुम्हाला सूक्ष्मातून कळते, हा चांगला भाग आहे.’’)
मला कायद्याचे संपूर्ण ज्ञान नाही. माझे इंग्रजीचे ज्ञानही जुजबी आहे; पण ‘या संघर्षमय स्थितीत आणि स्पर्धेच्या काळात केवळ साधनेच्या बळावर मी या नोकरीत टिकून आहे’, असेच मला वाटते. त्यामुळे ‘सर्वच अधिवक्त्यांनी साधना करणे आवश्यक आहे’, असे मला वाटते.
मला गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधनेत आणले. त्यांनीच मला ‘परीक्षण कसे करायचे ?’, हे शिकवले. हे केवळ त्यांच्या कृपेने शक्य झाले. ते त्यांच्याच चरणी अर्पण करते.’
|