कोल्हापूर – धर्मांतर आणि लव्ह जिहाद, तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदु समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी बिंदू चौक परिसरातून सकाळी १० वाजता ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. बैठका, प्रबोधन, विविध भेटी, हस्तपत्रके, फ्लेक्स फलक, सामाजिक माध्यम यांसह व्यापक स्तरावर याचा प्रचार करण्यात येत आहे. या मोच्र्याला आशीर्वाद मिळण्यासाठी ३० डिसेंबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात गरुड मंडप येथे दुपारी १२ वाजता श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालण्यात आले. ‘श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री अंबाबाईदेवीने या मोच्र्यासाठी बळ द्यावे, हिंदु समाजावर होणारे आघात दूर व्हावेत, मोर्चा निर्विघ्नपणे पार पडावा’, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.
या प्रसंगी सौ. धनश्री तोडकर, श्रीमती सुजाता पाटील, सौ. मेघा क्षीरसागर, सौ. जयश्री वायचळ, श्रीमती माधुरी भोसले, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. सविता दिवसे, सौ. अश्विनी जानवी-म्हसकर, सौ. हौसाबाई सुतार, अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री. पराग फडणीस, श्री. शिवानंद स्वामी, श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. राजू यादव, श्री. मधुकर नाझरे, श्री. किशोर घाडगे उपस्थित होते.