मैसुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून चर्चमध्ये तोडफोड  

सेंट मेरी चर्चमध्ये करण्यात आलेली तोडफोड

मैसुरू (कर्नाटक) – येथील पेरियापटना भागातील सेंट मेरी चर्चमध्ये २७ डिसेंबरला अज्ञातांनी तोडफोड केली. सायंकाळच्या वेळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींची ओळख पडताळण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेच्या चौकशीसाठी काही पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आक्रमण करण्यासाठी आक्रमणकर्त्यांनी चर्चचा मागील दार तोडले आणि आत प्रवेश केला. प्राथमिक स्तरावर ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याची शक्यता आहे; कारण आक्रमणकर्त्यांनी येथील दानपेटी पळवून नेली आहे.

सौजन्य : Hindustan Times