‘समाजामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार आणि काही संत लोकांना केवळ साधनेच्या संदर्भातील तात्त्विक भाग सांगतात; पण प्रत्यक्षात कुणीही त्यांच्याकडून साधना करवून घेत नाही. त्यामुळे समाजात आजवर काही पालट दिसून आलेले नाहीत. याउलट सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते. त्यामुळे सनातनच्या सहस्रो साधकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.५.२०२२)