…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल ! – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. मनोज खाडये, सौ. धनश्री केळशीकर आणि श्री. प्रसाद वडके

पेण, २५ डिसेंबर (वार्ता.) – आज भारतीय सैन्याकडे सर्वाधिक १८ लाख एकर, भारतीय रेल्वेकडे १२ लाख एकर, तर तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक म्हणजे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाकडे आहे. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतील तिरूचेथुरई हे गाव वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात इस्लामही अस्तित्वात नव्हता, त्यापूर्वीचे म्हणजे २ सहस्र वर्षांपूर्वीच गावांत आहे. हल्लीच पुण्यातील दौंड तालुक्यामधील पारगाव नामक गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानासाठी आरक्षित भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली. वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून वक्फ कायदा वेळीच रहित केला गेला नाही, तर भविष्यात भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल, अशी गंभीर चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी येथील वाल्मिक मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला संबोधित करतांना दिली.

सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव यांसह पू. भैरवसिंह राजपूत, संत दशनाम जुना आखाडा, श्री श्री १००८ श्री गोपीगीरी महाराज यांचे शिष्य यांची सभेला वंदनीय उपस्थित लाभली. सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

हिंदुबहुल भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी संविधानिकच ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचे जिहाद्यांचे षड्यंत्र उघड झाले आहे. गावागावांत देशविरोधी गट सक्रीय आहेत. मुसलमानबहुल भागात ‘शरिया’ कायद्याची मागणी केली जाते. हिंदूबहुल भारतात हिंदु राष्ट्राची मागणी संविधानिकच आहे. समितीने २० वर्षांत भारतभर सहस्रो हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन हिंदु राष्ट्राचा विचार हिंदूपर्यंत पोचवला आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन शक्ती आवश्यक ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

विश्वात कोणत्याही राष्ट्रांमध्ये बहुसंख्यांकांचा धर्म किंवा पंथ यांना कायद्याचा महत्त्वपूर्ण स्रोत मानून त्याला अधिकृत राजकीय संरक्षण दिले आहे. भारतात मात्र अल्पसंख्यांकांना विशेष संरक्षण दिले जाते; पण बहुसंख्यांकांना, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण नाही. मदरसांमधून इस्लामच, तर कॉन्व्हेंटमधून बायबल शिकवले जाऊ शकते मात्र; वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांमधून हिंदु धर्म शिकवायचा असेल, तर त्याला सरकारी अनुदान नाही. ही असमानता दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे आणि त्यासाठी भगवंताचे अर्थात् उपासनेचे अधिष्ठान हवे.

२५ डिसेंबरला पेणे येथे झालेल्या सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. समितीचे श्री. मनीष माळी यांनी हिंदु जनजागृती सभेच्या कार्याचा आढावा विषद केला. सभेच्या आरंभी हिंदु जनजागृती सभेची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. सभेचा समारोप ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु’ या श्लोकाने करण्यात आला. सभेला ७५० हिंदूंची उपस्थिती लाभली.

सभेतील अन्य विशेष !

  • सभेच्या आरंभी वेदमूर्ती श्री. अमित पाध्ये यांनी शंखनाद केला.
  • ‘वक्रतुंड महाकाय…’ हा श्री गणेशाचा श्लोक यावेळी पठण करण्यात आला.
  • मान्यवर वक्ते सर्वश्री मनोज खाड्ये, प्रसाद वडके, सौ. धनश्री केळशीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
  • हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी हिंदु राष्ट्राची प्रार्थना म्हटली.
  • मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
  • समितीचे श्री. बळीराम पाटील यांनी शंखनाद केला.

क्षणचित्रे

१. हिंदु संस्कृतीचे महत्व सांगणारा बालकक्ष सभेच्या ठिकाणी उभारण्यात आला होता.

२. यावेळी हिंदु जनजागृती सभेच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली.  

३. मान्यवर वक्त्यांचे सभास्थळी आगमन होताना उत्स्फूर्तपणे घोषणा देण्यात आल्या.

हिंदु राष्ट्र जागृतीच्या सभेच्या वेळी लाभलेला प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने समितीच्या वतीने पेण तालुक्यातील ४५ गावांत प्रसार करण्यात आला. या वेळी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांमुळे अनेक हिंदू नागरिक हतबल झालेले दिसले. समितीच्या कार्याची ओळख झाल्यावर त्यांना त्यातून आशेचा किरण दिसला. सभेला उपस्थित राहण्याची आणि समितीच्या कार्यात सहभागी होण्याची त्यांनी सिद्धता दर्शवली. रायगड जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत, जी हिंदूंकडूनच दुर्लक्षित झाली आहेत, या मंदिरांची स्वच्छता करण्याचा उपक्रम समितीच्या वतीने हाती घेण्याची विनंती त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना केली.

मान्यवरांची उपस्थिती

वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण, प्रवचनकार इस्कॉन, मूर्तीकार संघ, हिंदुत्ववादी, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, विविध संप्रदायांचे प्रमुख यांनी हिंदु राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकार्यात सहभाग घेतला.

ऑनलाईन उपस्थिती

हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले  होते. याचा अनेक हिंदूंनी लाभ घेतला. यावेळी ‘कमेंट बॉक्स’मध्ये अनेक हिंदूंनी सभेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.


सभेनंतरच्या आढावा बैठकांचा दिनांक, वेळ आणि स्थळ

१. मंगळवार, २७ डिसेंबर, रात्री ८ वाजता.

स्थळ : रेडवूड सिटी प्लाझा, पहिला मजला, आईस फॅक्टरीजवळ, आंतोरा फाटा, पेण.

२. बुधवार, २८ डिसेंबर, सायं. ७ वाजता.

स्थळ: प.पू. बालयोगी अदभुतानंद महाराज आश्रम सावरसई, पेण

३. गुरुवार, २९ डिसेंबर, सायं ७ वाजता.

स्थळ : श्री हनुमान आणि संत तुकाराम महाराज मंदिर, पेण

४. गुरुवार, २९ डिसेंबर, रात्री ८.३० वाजता.

स्थळ : श्री जगदंबादेवी मंदिर, वाशी, पेण.

५. शुक्रवार, ३० डिसेंबर, सायं ७ वाजता.

स्थळ : छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, हमरापूर, पेण.