तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या आध्यात्मिक उपायांचा आढावा प्रतिदिन घ्या !

पू. संदीप आळशी

‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचे आध्यात्मिक त्रास आध्यात्मिक उपायांमुळे लवकर अल्प होतात. असे होऊ नये; म्हणून अनिष्ट शक्ती साधकांच्या आध्यात्मिक उपायांमध्ये अडथळे आणायचा प्रयत्न करतात. बर्‍याचदा साधकांना उपाय मनापासून होण्यासाठी मनाचा संघर्ष करून प्रयत्न करावे लागतात. कधी कधी साधकांचा त्रास वाढल्यास किंवा त्यांच्या मनाची शक्ती अल्प पडल्यास त्यांना उपाय करायचा कंटाळा येतो. उपायांच्या वेळी संतांची भजने किंवा सात्त्विक नामजप न ऐकता सर्वसामान्य गायकाने गायलेली भक्तीगीते ऐकावीशी वाटतात. ‘उपायांपेक्षा सेवांनाच प्राधान्य द्यावे’, असे वाटणे इत्यादी आढळून येते. साधकांचे आध्यात्मिक उपाय पूर्ण किंवा नीट न झाल्यामुळे त्यांना नकारात्मकता येणे, अन्य साधकांविषयी विकल्प येणे, सेवेत निरुत्साह वाटणे, साधना करावीशी न वाटणे, मायेत रममाण होण्याचे विचार वाढणे इत्यादी आढळून येते.

तीव्र त्रास असलेल्या साधकांच्या संदर्भात वरीलप्रमाणे घडू नये, यासाठी त्यांचे दायित्व असलेल्या साधकांनी त्यांचा प्रतिदिन एकदा तरी आढावा घ्यावा. यामध्ये ते उपाय पूर्ण करतात ना, उपाय मनापासून करतात ना, सर्व प्रकारचे उपाय (उदा. आवरण काढणे, अत्तर-कापूर यांचे उपाय करणे) करतात ना, त्यांचे त्रास अल्प होत आहेत ना इत्यादींचा आढावा घ्यावा. साधकांनी उपाय करूनही त्यांचे त्रास अल्प होत नसल्यास त्यांना पुढच्या पुढच्या टप्प्याचे उपाय स्वतः सांगावेत किंवा याविषयी अधिक जाणकाराला अथवा संतांना विचारावे.

बर्‍याचदा त्रास असलेल्या साधकांना त्रासामुळे स्वतःच्या उपायांचे गांभीर्य रहात नाही. ‘अशांना साहाय्य करणे’, ही दायित्व असलेल्या साधकांची समष्टी साधनाच आहे. यासह त्रास असलेल्या साधकांनी ‘स्वतःचा आढावा दायित्व असलेल्या साधकांना देणे’, ही त्यांचीही साधनाच आहे.’

– (पू.) संदीप आळशी (११.११.२०२२)