
पुणे – गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे. पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई गुजरातच्या सुरत गुन्हे शाखेने केली आहे. दीपक हा ‘साई फॅशन’ नावाचे दुकान चालवत होता. तो पाकिस्तानच्या हामिद आणि काशिफ या २ आय.एस्.आय. एजंटांच्या संपर्कात होता, तसेच त्यांना संवेदनशील माहिती पुरवण्याचे काम करत होता. पुढील कारवाईसाठी साळुंखे याला गुजरात पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स गटाकडे (एस्.ओ.जी.) सोपवण्यात आले आहे, असे लष्करी गुप्तचर विभागाने कळवले आहे. पाकिस्तान एजंट हमीद याने महिलेच्या नावाने ‘फेसबुक अकाऊंट’च्या माध्यमातून साळुंकेला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर हमीदने स्वतःची खरी ओळख सांगितली.
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे
Anurag Dhankar Found Dead : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड हे पोलीस मुख्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !