तरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

कानपूर (उत्तरप्रदेश) – राज्यातील कानपूरसह १८ शहरे ‘सुरक्षित शहरे’ बनण्याच्या मार्गावर आहेत. आता उत्तरप्रदेशात गुन्हे न्यून झाले आहेत. गुन्हेगार गुन्हे करण्यापूर्वी विचार करतात.

आता एखाद्या चौकात तरुणीची छेड काढली किंवा एखाद्या गुन्हेगाराने दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर सीसीटीव्हीत तो दिसून येईल आणि पुढच्याच चौकात त्याला ठार मारले जाईल, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंती योगी आदित्यनाथ यांनी येथे प्रबुद्धजन संमेलनात केले.