‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ जगन्माता भासतात’, असे सांगणार्‍या त्यांच्या भगिनी सौ. शीतल गोगटे !

सौ. शीतल गोगटे

१. दैवी दौरा करून घरी आलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा चैतन्यमय सत्संग !

जानेवारी २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई दौरा करून आमच्या घरी मिरजेला आली. त्या वेळी खरेतर ती पुष्कळ दमली होती; पण तिचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता. ती घरी आल्यावर ‘घराभोवतीचा परिसर आणि आमचे घर चैतन्याने भारित झाले आहे’, असे मला जाणवले. ताई बोलत असतांना तिचा प्रत्येक शब्द चैतन्य देणारा होता. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) ताई ज्या ज्या देवळांत जाते, तिथे येणार्‍या सर्व भक्तगणांना तिच्या चेहर्‍यावरील चैतन्य लक्षात येते आणि ते ताईला ‘माताजी’ असे संबोधून नमस्कार करतात. ताई सर्वांशी प्रेमाने बोलून त्यांना आपलेसे करते. हा गुण तिच्यात आधीपासूनच आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताईच्या कृपेमुळेच आम्हा सर्व साधकांचा साधनाप्रवास चालू आहे. ती आमच्या सर्वांचे त्रास झेलत आहे. अशा माझ्याच नाही, तर सर्व विश्वाच्या श्रीचित्शक्तीला मी नमस्कार करते आणि आशीर्वाद मागते की, ‘पुढच्या साधनेसाठी मला बळ दे !’

‘प.पू. गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त मी हे लिहू शकले. तुमच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

– सौ. शीतल अभय गोगटे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची लहान बहीण) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४५ वर्षे), मिरज, जि. सांगली. (२६.११.२०२२)


श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात जाणवणार्‍या देवीच्या रूपांवरून सुचलेली कविता !

मला देवीची सर्व रूपे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताईमध्ये अनुभवता येतात. कधी ती ‘सरस्वती’ होते, तर कधी ‘कोल्हापूरची अंबाबाई’ होते. या रूपांवरून सुचलेली कविता पुढे दिली आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई भासते जणू ‘जगन्माता’ ।
कृतज्ञता व्यक्त करते, प.पू. गुरुमाऊली(टीप १) ।
तुम्ही आम्हाला अशी बहीण दिली ।। १ ।।

बहीण म्हटले, तरी ती आमची आई असे ।
किती वर्णन करू तिचे, शब्दही असती अपुरे ।। २ ।।

ती समोर दिसता, ‘हे तिचे कोणते रूप ?’ ते न कळे ।
किती वर्णू रूपे तिची, हेही मला कधी न कळे ।। ३ ।।

बोलायला लागली ताई की, जणू ‘सरस्वती’ दिसे ।
सतत बघत राहिले की, मज ‘अंबामाता’ दिसे ।। ४ ।।

हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांतील अश्रू ना थांबे ।
गुरुदेवा, अशी बहीण दिलीत, आभार किती मानू तुमचे ।। ५ ।।

तुम्हीच दिली आम्हाला विविध रूपे असलेली माता ।
पण ती आता आमची न रहाता भासते ‘जगन्माता’ ।। ६ ।।

टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– सौ. शीतल अभय गोगटे