पुणे – पुण्यातील शिवसैनिकांनी (ठाकरे गट) येथील स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटक राज्याच्या परिवहन बसेसवर काळे फासून त्यावर ‘जय महाराष्ट्र’ लिहून निषेध नोंदवला आहे. जर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या गाड्यांना कर्नाटकात त्रास दिला, तर आम्ही एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले. या वेळी अनेक आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले.
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास काही काळ कर्नाटकात एस्.टी. पाठवू नयेत, अशी विनंती केली आहे.