इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

मुस्लिम राष्ट्रीय मंचचे अलीगड जिल्हा संयोजक मौलाना राव मुशर्रफ यांचे परखड प्रतिपादन !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

अलीगड (उत्तरप्रदेश) – कर्णावती येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी ‘निवडणुकीमध्ये महिलांना उमेदवारी देऊ नये’, असे आवाहन केले होते. त्यावर मुस्लिम राष्ट्रीय मंचचे जिल्हा संयोजक आणि देवबंदचे मौलाना राव मुशर्रफ यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मशिदीमध्ये जाणार्‍या महिलांची इमामांकडून छेड काढली जाते किंवा त्यांच्या अनुयायांकडून बलात्काराचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत.


मौलाना राव मुशर्रफ यांनी सांगितले की, मशिदींमध्ये जाण्यास महिलांना बंदी नाही. जर मुसलमान पुरुष आणि महिला हजयात्रा करू शकतात, तर त्या मशिदीमध्ये का जाऊ शकत नाहीत ? कुराण आणि हदीस (एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महंमद पैगंबर कसे वागले, कसे बोलले यांचा संग्रह) यांमध्ये महिलांना मशिदीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेले नाही.

मुसलमान महिलांनीच स्वतःहून मशिदीमध्ये जाणे बंद केले; कारण तेथे इमाम त्यांची छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात. इस्लामने महिलांना समानतेचा अधिकार दिला नसता, तर बेनझीर भुट्टो आणि शेख हसीना या दोघी पंतप्रधानपदापर्यंत कशा पोचल्या असत्या ? इमाम शब्बीर यांच्यासारख्यांच्या बोलण्यावर बंदी घातली पाहिजे. भारतातील कायदा महिलांना समानतेचा अधिकार देतो. मतदान करण्यापासून निवडणूक लढण्यापर्यंतचा अधिकार देतो.

संपादकीय भूमिका

  • एका मौलानानेच हे उघड केल्याने यावर अन्य कुणाला काही बोलण्याचीच आवश्यकता नाही, हे स्पष्ट होते !
  • जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?