
वरवंड (जिल्हा पुणे) – येथील पृथ्वीराजनगर यवत येथे शासकीय स्मशानभूमीमध्ये कत्तलीसाठी ३ दिवस चारापाण्यापासून वंचित ८ गोवंश जातीची जनावरे बांधलेली आहेत, अशी माहिती गोरक्षकांना मिळाल्यावर २८ नोव्हेंबर या दिवशी यवत पोलिसांच्या साहाय्याने जनावरांची सुटका करण्यात आली, तसेच यवत केडगाव हद्दीत एका ‘पिकअप’मध्ये २ म्हशी आणि ६ रेडकू हे कोंढवा येथील पशूवधगृहात घेऊन जात असतांना यवत पोलिसांच्या साहाय्याने जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
(सौजन्य : जगतारा टाइम्स)
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुटका केलेल्या १६ गोवंशियांना बोरबलनाथ गोशाळेत सोडण्यात आले आहे. या कारवाईत सुरज नवळे, मंगेश चिमकर, शादाब मुलाणी, अहिरेश्रर जगताप, निखिल दरेकर आदींचा मोठा सहभाग होता.
संपादकीय भूमिकाकत्तलीसाठी घेऊन जाणार्या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते ! |