अधिवक्त्यांकडून ‘बक्षिस’ घेण्यासाठी जमादाराने कमरेवर ‘पेटीएम्’ क्युआर् कोड लावले !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले निलंबित !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील अलाहाबाद उच्च न्यायालयातील जमादार राजेंद्र कुमार याने त्याच्या कमरेवर पेटीएम्चा क्युआर कोड लावून त्याद्वारे अधिवक्त्यांकडून ‘बक्षिस’ घेत असल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांनी या घटनेला गांभीर्याने घेऊन त्याला निलंबित केले.

या जमादाराचा कमरेवर पेटीएम क्युआर् कोड लावलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याची नोंद घेऊन कारवाई करण्यात आली.(पेटीएम हे एक ऑनलाईन पैसे हस्तांतर करणारे अ‍ॅप आहे)

संपादकीय भूमिका

आता अशा प्रकारचे पैसे घेण्यासाठीही डिजिटलचा लाभ घेतला जाणे, याला ‘प्रगती’ म्हणायची का ?