सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग होता. भक्तीसत्संग चालू झाल्यावर मी पायथळ (फुटरेस्ट) बाहेर काढत असतांना ‘त्यावर काहीतरी चमकत आहे’, असे माझ्या लक्षात आले. निरखून पाहिल्यावर त्यावर साधारण ३५ ते ४० दैवीकण होते. आरंभी ‘ते चंदेरी रंगाचे कण आहेत’, असे मला वाटले. प्रत्यक्षात एकाच कणामध्ये विविध रंग अंतर्भूत असलेले ते वैशिष्ट्यपूर्ण दैवीकण होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी ही अनुभूती देऊन मला पुन्हा एकदा स्थुलातून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
‘परात्पर गुरु डॉक्टर सतत माझ्या समवेत आहेत’, अशी अनुभूती मला सूक्ष्मातून येत असते; परंतु कधीतरी ‘स्थुलातून त्यांना अनुभवावे’, असे माझ्या मनात असायचे. दैवीकण पाहिल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची छोट्यातील छोटी इच्छाही पूर्ण करतात आणि त्यांना अनुभूती देऊन आनंद देतात’, हे माझ्या लक्षात आले. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
भावाचे ते अश्रू दाटले ।
मनी तुझे रूप ठसले ।
तुझ्याविना सर्व फसवे ।
तूच एक मज आठवे ।।’
– सौ. अनुश्री रोहित साळुंके (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |