हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर आणि लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

मंगळुरू (कर्नाटक)- येथे एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी धर्मांध महिला डॉक्टरसह ३ धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

१. प्रसारमाध्यमातील एका वृत्तानुसार पीडित तरुणी भ्रमणभाष रिचार्ज करण्यासाठी खलील नावाच्या धर्मांधाच्या दुकानात जात असे. खलील याने तिच्याशी मैत्री केली आणि तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

२. खलील याने तिचे नाव पालटून आयशा ठेवले. तिला नमाजपठण करण्यास आणि कुराणाचे वाचन करण्यास भाग पाडले. खलील याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

३. खलील याने पीडित मुलीला नोकरीच्या निमित्ताने डॉ. जमिला हिच्या घरी नेले. तिथे पीडित मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले. तेथे आयमान नावाच्या धर्मांध व्यक्तीने तिच्याशी इंस्टाग्रामवर संपर्क साधला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

४. पीडित मुलीच्या आईने खलील, डॉ. जमिला आणि आयमन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. ‘या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील अन्वेषण चालू केले आहे’, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.