नवी मुंबई ते अलिबाग वॉटर टॅक्सी सेवा चालू !

नवी मुंबई – बेलापूर ते मांढवापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा चालू करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सवा घंट्यात पार करता येणार आहे. सध्या ही सेवा केवळ शनिवार आणि रविवार या दिवशी चालू असेल. ‘मेरिटाईम बोर्डा’च्या अनुमतीने ही सेवा चालू करण्यात आली आहे.

बेलापूर येथून सकाळी ८ वाजता आणि मांडवा येथून संध्याकाळी ६ वाजता ही सेवा उपलब्ध होईल. या सेवेसाठी ऑनलाईन नोंदणीही करता येणार आहे. प्रतीप्रवासी ३०० रुपये भाडे आकारण्यात येईल. ‘जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सेवा चालू करण्यात आली आहे. यासाठी अन्य मार्गांचीही चाचपणी चालू आहे’, अशी माहिती मेरिटाईम बोर्ड अधिकारी संजय शर्मा यांनी दिली आहे.