कल्याण पूर्व येथील इमारतीत शिरून बिबट्याचे एकावर आक्रमण !

ठाणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टॉवर या इमारतीत २४ नोव्हेंबरला बिबट्या शिरला होता. बिबट्या सोसायटीत आल्याची माहिती नसल्याने घराबाहेर पडलेल्या तिघांवर त्याने आक्रमण केले. यात एक ज्येष्ठ नागरिक गंभीररित्या घायाळ झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सकाळी ८.३० वाजल्यापासून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न चालू होता. १२ घंट्यांनंतर त्याला पकडण्यात यश आले.