पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानाशी विवाह  

नवी देहली – पाकिस्तानच्या सिंधमधील नांगरपारकर येथे मुस्तफा खसखली या मुसलमानाने विवाहित हिंदु महिलेचे अपहरण केले आणि बलपूर्वक तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझर ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भील यांनी ट्वीट करून दिली आहे. (पाकमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार पावले उचलणार का ? – संपादक) भील यांनी, ‘येथे कुणीही आमच्यावर दया दाखवणारे दिसत नाहीत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि त्याहीपेक्षा आम्ही माणूस आहोत.’

संपादकीय भूमिका

  • येत्या काही वर्षांत ‘पाकमध्ये हिंदु रहात होते’, असे सांगावे लागणार आहे !