तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा कार्यकर्त्यांना बांगलादेशातून आलेल्या हिंदूंच्या संदर्भात द्वेषमूलक सूचना
बर्धमान (बंगाल) – येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार खोकन दास यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात ते म्हणत आहेत, ‘अनेक नवीन लोक येत आहेत, ते बांगलादेशातील आहेत. यांतील अनेक हिंदु धार्मिक भावनेच्या आधारे भाजपला मतदान करतात. यामुळे आपल्याला हे निश्चित केले पाहिजे की, आमच्या पक्षाला समर्थन करणार्यांनाच मतदारसूचीमध्ये जागा मिळाली पाहिजे.’ हा व्हिडिओ १५ नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या एका सभेमधील असल्याचे सांगितले जात आहे.
WB | Many new people are coming to the state from Bangladesh…Many of these people vote for BJP based on Hindu sentiments. Please ensure only those who support our party get a place in the voters’ list: TMC MLA Khokan Das (12.11) pic.twitter.com/QbRRIsvjpI
— ANI (@ANI) November 17, 2022
दास यांच्या विधानावर भाजपचे बर्धमान जिल्ह्याचे प्रवक्ते सौम्यराज मुखोपाध्याय यांनी म्हटले की, दास यांनी या समस्येचे राजकारण करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकार यांना या घुसखोरीची माहिती दिली पाहिजे. याच कारणामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा आम्ही लागू करत आहोत.
खोकन दास यांची कोलांटउडी !
या व्हिडिओतील विधानाविषयी पत्रकारांनी खोकन दास यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, घुसखोर बांगलादेशी प्रतिदिन आमच्या भागात प्रवेश करत आहेत. मी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, त्यांची नावे मतदारसूचीमध्ये समाविष्ट होऊ नयेत.
संपादकीय भूमिका
|