वणी (जिल्हा यवतमाळ) तालुक्यातील ८ वाघांमुळे दहशत !

वणी (जिल्हा यवतमाळ), १५ नोव्हेंबर (वार्ता.) – तालुक्यात १० नोव्हेंबरला भुरकी या गावात वाघाने २३ वर्षीय युवकाचा बळी घेतला. तेव्हापासून संपूर्ण तालुका वाघाच्या दहशतीत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही यांच्या माध्यमातून लक्षात आले की, तालुक्यात ८ वाघ आहेत. वनविभागाने शेतकरी, शेतमजूर यांना सावध रहाण्याची सूचना केली आहे.