१३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : मुलीचे स्तन, गुप्तांग आणि जीभ कापली

समस्तीपूर (बिहार) – येथील  एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापण्यात आली. नंतर तिला मृत
समजून बागेत फेकून दिले  आणि आरोपी निघून गेले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. याविषयीच्या एका वृत्तानुसार ११ नोव्हेंबर या दिवशी काही नराधमांनी मुलीला घरातून पळवले. यानंतर सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. बरीच शोधाशोध केल्यावर मुलगी बागेत रक्ताच्या थारोळ्यात सापडली. समस्तीपूरचे पोलीस अधीक्षक हृदयकांत यांनी सांगितले की, १३ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या घटनेतील दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

अशा नराधमांना भर चौकात फासावर लटकवण्याची शिक्षा देणे आवश्यक !