होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहताकाका फेब्रुवारी २०२२ मध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी आले होते. तेव्हा ते आश्रमातील रुग्ण साधकांची चिकित्सा करून त्यांना औषधे देत होते.  २८.२.२०२२ या दिवशी ते माझी शारीरिक चिकित्सा करण्यासाठी माझ्या खोलीत आले होते. तेव्हा मी त्यांना मला होणारे विविध प्रकारचे शारीरिक त्रास सांगितले. ते जेव्हा माझी चिकित्सा करत होते, तेव्हा मला त्यांच्या संदर्भात पुढील गुणवैशिष्ट्ये जाणवली. 

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

१. काकांमधील चैतन्याचे प्रमाण आधीपेक्षा पुष्कळ प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जेव्हा ते माझ्या रहात्या खोलीत आले, तेव्हा मला आणि माझ्या आईला खोलीमध्ये पिवळसर रंगाचा प्रकाश पसरल्याचे जाणवून ‘खोली आधीपेक्षा पुष्कळ प्रमाणात उजळ झालेली आहे’, असे जाणवले.

कु. मधुरा भोसले

२. जेव्हा मी डॉ. मेहताकाकांना मला होणार्‍या त्रासांविषयी सांगत होते, तेव्हा ते एकाग्र चित्ताने मला होणारे त्रास ऐकत होते. तेव्हा मला ‘त्यांचे ध्यान लागलेले आहे’, असे मला जाणवले.

३. जेव्हा ते माझी चिकित्सा करण्यासाठी मला प्रश्न विचारत होते, तेव्हा त्यांच्यातील ‘संयम आणि प्रीती’, हे दोन्ही गुण आधीपेक्षा पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवले.

४. जेव्हा आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत होतो, तेव्हा त्यांचा परात्पर गुरुदेवांच्या संदर्भातील समर्पणभाव पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवले.

५. डॉ. मेहताकाकांकडून प्रक्षेपित होणारी देवतांची प्रकट शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरींमुळे माझ्या खोलीची शुद्धी झाली अन् खोली चांगल्या स्पंदनांनी भारित झाल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे खोलीतील देवघर आणि भिंती यांच्यावर लावलेली देवतांची चित्रे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र हे आधीपेक्षा अधिक प्रमाणात सजीव झाल्याचे जाणवले.

६. डॉ. मेहताकाकांकडून मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. जेव्हा ते बोलत होते, तेव्हा या सुगंधाचे प्रक्षेपण आधीपेक्षा पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवले.

७. डॉ. मेहताकाकांच्या सहवासात असतांना मला, आईला आणि खोलीत पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.

पूर्वीच्या तुलनेत त्यांनी केलेली रुग्णांची चिकित्सा आणि त्यांच्यावरील उपाय यांची परिणामकारकता पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवले. श्री गुरूंच्या कृपेने डॉ. मेहताकाकांच्या संदर्भात मला वरील अनुभूती अनुभवण्यास मिळाल्या’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक