पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८३ वर्षे) यांच्यातील चैतन्याची आलेली अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासू आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या आई पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (फोंडा, गोवा) या रुग्णाईत असतांना मला त्यांची सेवा करण्याची अमूल्य संधी लाभली. त्या कालावधीमध्ये मला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

१. साधिकेला अकस्मात् तीव्र डोकेदुखीचा त्रास होणे

१६.१०.२०२२ च्या रात्री मला अकस्मात् तीव्र डोकेदुखीचा त्रास चालू झाला. त्यावर मी शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर उपाय केले; पण तरीही तो उणावला नाही. त्यानंतर मी सहज पू. सिंगबाळआजी यांना माझ्या त्रासाबद्दल सांगितले आणि मग मी पुढील सेवा करू लागले.

२. पू. सिंगबाळआजी यांनी हाताची बोटे माझ्या आज्ञाचक्रावर ठेवल्यावर डोकेदुखीचा त्रास दूर होणे 

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

मी ‘पू. आजींना माझ्या त्रासाबद्दल सांगितले’, हे मी विसरूनही गेले होते; पण काही वेळाने पू. आजींनी स्वतःहून आठवणीने मला माझ्या त्रासाविषयी विचारले.

मी त्यांना ‘माझ्या त्रासाची तीव्रता तशीच आहे’, हे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या डाव्या हाताची बोटे माझ्या आज्ञाचक्रावर ठेवली. तेव्हा पू. आजींच्या हाताच्या बोटांतील चैतन्य आणि शक्ती माझ्या आज्ञाचक्रामध्ये जाऊन मला तेथे संवेदना जाणवल्या. माझे कपाळ आणि डोके यांमध्ये थंडावा जाणवला. मला २ – ३ घंट्यांपासून होत असलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास ५ – ७ मिनिटांमध्येच पूर्णपणे थांबला.

३. संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येणे

या प्रसंगातून मला ‘संत म्हणजे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप असतात’, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येऊन त्यांच्या सत्संगातून ‘ते सर्वांच्या उद्धारासाठी कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना 

‘पू. सिंगबाळआजी यांच्यातील चैतन्यामुळे माझा त्रास नष्ट झाला आणि यातून मला त्यांची प्रीती अनुभवता आली. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. सिंगबाळआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

‘हे गुरुदेवा(परात्पर गुरु डॉ. आठवले), पू. सिंगबाळआजी यांचे गुण आमच्यामध्ये येऊन तुम्हाला अपेक्षित अशी साधना आम्हा सर्वांकडून करून घ्या’, अशी तुमच्या सुकोमल चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक